Pages

07 February 2015

ऋणी

हर रिश्ते का नाम जरूरी नहीं होता,
कुछ बेनाम रिश्ते रुकी जिंदगी को साँसे देते है...!
हे अप्रतिम शंब्द वाचले आणि आयुष्याच्या अनेक वळणावर जेव्हा गरज होती तेव्हा मदतीचा हात आवर्जून पुढे केलेले अनेक मित्र मैत्रिणी आणि अनोळखी माणस आठवली. प्रत्येकाला जीवन प्रवासात ही अशी माणस भेटतातच जी ओळख नसूनही ऐन वेळी मदत करून जातात. जेव्हा जीवन निराशेने ग्रासलेल असत, आपल कुणीच नाही अस वाटत, अगदी रक्ताची नाती सुद्धा दुरावली जातात तेव्हा हीच परिसस्पर्शी माणस आपला आधार होतात.स्वतःवरील विश्वास गमावलेले आपण त्यांच्या उभारीच्या शब्दांनी पुन्हा उभे रहातो. तस पहाता ते आपले कुणीच नसतात पण त्यांच्यातील चांगुलपणा हा आपल्या मैत्रीचा आणि आयुष्याचा कायमचा आधार बनतो. आपण आपल्या आयुष्यात संकुचित वृतीने जगत असतो परंतु ह्या वलयाला भेदून माणुसकीने आपल्या मनाचा एक कोपरा भारावून टाकण्याच काम अशी माणस करतात. आयुष्यात जे काही चांगल घडत ते अधिकतर अशाच नाव नसलेल्या नात्यांनी वेळोवेळी केलेल्या मदतीमुळे…सगळीच नाती शाश्वत स्वरूप घेत नाहीत पण त्या त्या वेळी त्यांनी दिलेला मदतीचा हात मात्र तुमच जीवन सुसह्य आणि सुखद करत. काहीना आपण मैत्रीच्या नात्यात स्वीकारतो तर काही माणस अशीच विस्मरणात जातात. आपण विसरलो तरी आयुष्याच्या त्या त्या क्षणावर त्याची मोहोर कायमची उमटलेली असते. रक्ताची नाती जितकी महत्वाची तितकीच महत्वाची असलेली ही भावपूर्ण नाती आपण स्मरली पाहिजेत ज्याने चांगुलपणावरील आपला विश्वास दृढ होईल .मैत्री असो की एखाद्या अनोळखी व्यक्तीने अटीतटीच्या प्रसंगी केलेली मदत ज्याने आपण सावरले जातो , आयुष्याला योग्य दिशा आणि आशा मिळते त्याचं ऋणी नेहमीच राहील पाहिजे नाही का ? ………मिनल सबनीस
 
 

No comments:

Post a Comment

Comment Here