Pages

12 March 2015

"बंध रेश्माचे"


***********

" कुणासाठी कुणीतरी झुरत असतं...
एक हळवा ऋतु मनात जपत असतं..."

तारूण्याच्या उंबरठ्यावर " प्रेमाची हिरवळ" कुणाला नको असते ! अन् या हळव्या ऋतुत जो नाजूक " बंध "
तयार होतो त्याला आपण " रेश्मी बंध" असे म्हणतो.

'या बंधातून , जो जाणिवांना एक आगळाच स्पर्श जाणवतो तो म्हणजे " जिव्हाळा" .
हा जिव्हाळा ज्या व्यक्ती कडून मिळतो ती आपली जिवलग होते'.

पण खर-या प्रेमाचा अर्थ जाणवायला योग्य वेळ यावी लागते. बर-याचदा आपले खरे प्रेम आपल्या नजरेसमोर असून देखील ते दिसत नाही.
आणि आपण मृगजळा मागे धावतो. शेवटी मृगजळच ते प्रेमाची तहान कशी शमवणार?.
'आयुष्य कोरडेच रहाते.'

ह्रदयाचा वसंत बहरण्यास प्रेमाच्या पालवीला अंतरमनापासून भिजवणार-या प्रेमसरींची खरी गरज असते. तेव्हाच श्रावणसरींचा गारवा आपल्या स्पंदनांना स्पर्श करून जातो.

आपल्यावर जिवापाड प्रेम करणारी व्यक्ती कधीही गमवू नका. अशी व्यक्ती आयुष्यात यायला भाग्य लागतं. आणि तिचा शोध घेताना आयुष्य संपतं.
आपल्या जीवनबागेत उमललेले हे फूल जोपासून ठेवा.
जिवलगाची काळजी घ्या.

आणि मनातल्या भावना वेळेवर व्यक्त करा. वेळ निघून गेल्यावर कदाचित, आपण एखादा आपुलकीचा बंध गमावून बसू शकतो.
तेव्हा खर-या भावनेने जिवलगाचा हात हातात घेऊन जीवनाचा प्रवास सुखकर करा.

No comments:

Post a Comment

Comment Here