"ये दोस्ती हम नही तोडेंगे"
हे शोले चित्रपटातील गीत प्रत्येकजण हमखास गुणगुणत असतो. पण त्याचा मतितार्थ आपण कधी लक्षात घेतला आहे का? खर तर ,मैत्री इतकी अगाध आहे की, जी निवडक शब्दात कैद करणे शक्य नाही.
केवळ 'फ्रेन्डशीप डे 'ला हातात एकमेकांना रंगीत रेश्मी धागे बांधून मैत्रीची कर्तव्ये मर्यादीत धाग्यात बांधता येत नाही. मैत्रीच्या उत्सवाला आवश्यक आहे ते त्या रेश्मी धाग्यात गुंतलेल्या भावनांतील मैत्रीचा गंध जाणून घेणे व तो आजीवन टिकवणे.
नुसतं कॅन्टीनमधे एकमेकांना कंपनी दिली ,जोडीने लेक्चर्स बंक केली. म्हणजे मैत्रीची इतिकर्तव्यता,
साध्य होत नाही. मैत्रीच्या रोपट्याला रूजवायचे असेल तर त्याला विश्वासाचे ,आत्मबलाचे खत पाणी घालावे लागते. तरच मैत्रीची पालवी दिमाखात खुलते.
मैत्री ही आरशाप्रमाणे पारदर्शक असते. जिच्यात आपण आपल्या अस्तित्वाचे प्रतिबिंब पहातो व स्वतः चे अवलोकन करतो. खरी मैत्री नेहमी व्दिरंगी असते. प्रसंगी मृदू वाणीने आपल्याला आनंदी करते.तर प्रसंगी आपल्याला जीवनाचे बाळकडूच देते.
खरी मैत्री तीचा सुखाचा असणारा असा धागा कटू अनुभवात देखील सैल होत नाही. उलट सहवासातून अधिकच गुंतत जातो.व तो जितका अधिक गुंततो तितके अधिक सुंदर असे मैत्रीचे रेश्मी वस्त्र विणू लागतो मैत्रीच्या सुरावटींवरून तुम्हाला आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर एकच स्वर ऐकू येईल तो म्हणजे,
दुःख येती थव्याने,
येत जाती नव्याने,
जीवनाची निशाणी
हिच असते कहाणी
यात शोधायचा रे क्षणाचा
एक धागा असा मैत्रीचा.....

No comments:
Post a Comment
Comment Here