आपल्याला भेटलेली अनेक माणस त्यात खऱ्या
अर्थाने ज्याचं कौतुक केल गेल पाहिजे अशाच एका व्यक्ती विषयी तुम्हाला
सांगावस वाटत….
मनन एक अत्यंत हुशार, बुद्धिमान मुलगा पण अतिशय सहृदय आणि साधा …. सगळ शिक्षण त्याने शिष्य वृत्ती घेवून पूर्ण केल. सोफ्ट वेअर इंजीनियर झाला. आज अमेरिकेत मोठ्या कंपनी मधे गेले ४ वर्ष तो उच्च पदावर आहे. त्याला सहज अमेरीकेच नागरिकत्व मिळू शकत. परंतु अजून २ वर्ष राहून त्याने परत भारतात येण्याचा निर्णय घेतला. त्याच्या सगळ्या मित्रांनी त्याला मुर्खात काढल. पण तो निर्णयावर ठाम आहे. आई वडिलांनी कर्ज घेऊन त्याच शिक्षण पूर्ण केल , उच्च शिक्षणासाठी त्याला परदेशात पाठवलं. त्याने तिथे नोकरी करून आधी ते कर्ज फेडल. त्यांच्यासाठी घर , गाडी घेतली , सगळ्या आरामाच्या गोष्टी त्याने त्यांना दिल्या. पण तरीही त्याने परत येण्याचा निर्णय घेतला तो पुन्हा आई वडिलांसाठी. मुळात त्याला माणसांमधे राहण्याची प्रचंड आवड त्यामुळे अमेरिकेत पैसा आहे पण तितकाच एकटेपणा त्याला जाणवतो. एकुलता एक आहे पण आई वडील म्हणजे त्याच दैवत. तो म्हणतो पैसा भारतातही कमावता येईलंच की इथे राहिलो तर निदान आई बाबा एकटे रहाणार नाहीत. त्यांना माझी आणि मला त्यांची काळजी वाटणार नाही. माणसांची कसर पैसा भरून काढू शकत नाही ना ? त्यांनी त्याचं कर्तव्य केल मग आता त्यांच्या उतरत्या वयात मी त्यांना एकट सोडण बरोबर नाही. भारतात भलेही खूप पैसा नसेल पण मित्र आणि आपल्या माणसांची उणीव नाही.मुख्य म्हणजे आता माझ्या देशालाही माझ्या ज्ञानाचा फायदा मिळू दे. मी फक्त दोन वर्ष माझा करार संपेपर्यंत तिथे राहीन मग भारतात परत येईन. अनेकांना त्याची भूमिका पटेल अस नाही परंतु अशा विचारांची व्यक्ती वयाने लहान असली तरी नक्कीच आदराच्या पात्रतेची आहे अस मला प्रामाणिकपणे वाटत. आपण जमिनीवर पाय असण अस जे म्हणतो ते अशाच असामान्य लोकांसाठी.आजच्या काळात प्रत्येकाला परदेशाच वेड असताना अशा विचारांची मुलही आहेत हे बघून मानाचा मुजरा करावासा वाटला. सुखलोलुपता म्हणजे आयुष्य नसत तर जगताना दुसर्याचा विचार हा जगण्याचा पाया असावा ह्याच हे एक सुंदर उदाहरण. कसाही असला तरी आपला देश हेच आपल खर आश्रय स्थान असत. आपला देश आपल्यासाठी काय करतो त्यापेक्षा आपण देशासाठी काय करू शकतो हा विचार गरजेचा आहे. जो विचार मातृभूमीसाठी तोच आईवडिलांसाठी त्याने केलेला आहे. अशा विचारांना रुजवणारे संस्कार आणि आईवडील दोघेही वंदनीय आहेत नाही का ?.

…………मिनल सबनीस
No comments:
Post a Comment
Comment Here