Pages

28 February 2015

सुखाची गुरुकिल्ली


कीर्ती अनेक दिवस घरी बोलवत होती. शेवटी रविवारी तिच्या घरी आम्ही मैत्रिणी गेलो. पहिल्यांदाच जात होतो. ती स्वतः श्रीमंत कुटुंबातली त्यामुळे सगळ्यांच्या मनात तीच घर कस असेल ह्याची उत्सुकता होती. तिचा प्रेम विवाह होता. शेवटी घर शोधत तिच्या घरी पोचलो. तिच्या घरात पाऊल टाकल्यावरच अतिशय प्रसन्न वाटल. ती आणि तिचे पती शेखर हसतमुखाने आम्हाला भेटले. मनसोक्त गप्पा झाल्या. लग्नाआधी ३ बेडरूम असलेल्या घरात राहणारी कीर्ती आज वन रूम किचेन मधे छानसा संसार मांडून तितकीच सुखी दिसत होती. घरी खूप काही वैभव नव्हत पण त्या दोघांच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आणि सुख दिसत होत. खरच प्रसन्नतेचा आणि सुखाचा संबंध हा नेहमी मनाशी असतो तेच खर. तुमच्या मनाची आनंदी राहण्याची गरज जिथे पूर्ण होते तिथेच तुम्ही सुखी रहाता. कीर्तीला हवा असलेला जोडीदार मिळाला होता आणि ते सुख तिच्यासाठी लाख मोलाच होत. मोठ्या मोठ्या घराच्या एकट्या भिंती आजकाल खूप काही सांगून जातात.आपल्याकडे काय नाही ह्याचाच सतत विचार करणारी माणसच अधिक… माझा एक मित्र त्याच्याकडे खूप साधा मोबाईल आहे त्याला सगळे कंजूस म्हणून चिडवतात. पण तो सगळ्यांना एक गोष्ट नेहमी विचारतो " जर माझी कुणाशी बोलायची गरज जर ५००० पूर्ण होते तर मी त्यासाठी २५००० का खर्च करू ? माझा मोबाईल साधा असला तरी मी आठवणीने तुम्हा सगळ्यांना फोन करतो पण तुमचे इतके महागडे फोन असून तुम्ही साधा मेसेज पण करत नाही. मी जसा आहे त्यात खुश आहे. माझ्या सुखाची व्याख्या दुसर कुणी नाही तर मीच ठरवणार ना ? " खरच सुख सुख म्हणजे तरी काय ? भरपूर पैसा , संपन्नता , वस्तूंची रेलचेल ?.... नक्कीच नाही. सुख हे फक्त आणि फक्त मनाच्या अंतरीम समाधानावर अवलंबून असत. वैभव, ऐश्वर्य, पैसा ह्या सगळ्या गोष्टी हे समाधान नावाच विकत घेऊ शकत नाहीत.अनेकदा ह्याच गोष्टीनी मन दुभंगली जातात , दुखी होतात. सुखाची व्याख्या ज्याची त्याची वेगळी असली तरी जिथे मन सुखी तिथेच प्रसन्नता आणि समाधान वास करते हे मात्र खर…जे आहे ते पुरेस आहे आणि ज्याची गरज आहे ते मिळवायची हिंमत आणि तयारी आहे असा आत्मविश्वास म्हणजे सुख...साधेपणा , सुसंस्कृत वृत्ती , अध्यात्मिक बैठक असलेली व्यक्ती ऐश्वर्य संपन्न नसली तरी खर्या अर्थाने सुखी असते कारण सुख आणि सुख लोलुपता ह्यातला फरक त्याने योग्य प्रकारे जाणलेला असतो.
.…… मिनल सबनीस
 

No comments:

Post a Comment

Comment Here