"मिनू
थोड बोलायचं होत भेटशील का ?" जागृतीचा मेसेज आला. काहीतरी घडल असाव अशी
शंका वाटली. मी लगेच हो म्हटलं. जागृती भेटली तेव्हा खूप थकलेली कोमेजलेली
वाटत होती. खूप दिवस झोप झाली नसावी अशी. थोडा वेळ काही बोलली नाही मग
अचानक रडायला लागली. " प्रथमेश लग्न करतोय आई वडिलांनी ठरवलेल्या मुली
सोबत. हे असच होणार हे माहित असूनही मी त्याच्या प्रेमात पडले , गुंतले आणि
आत्ता त्यातून बाहेर पडताना मला खूप त्रास होतोय
मिनू . ह्यापेक्षा मरण पत्करलं अस वाटतंय. आमच लग्न कधीच होणार नाही
ह्याची त्याला आणि मलाही कल्पना होती. पण त्याला माझ्यात आणि मला त्याच्यात
आपला जोडीदार दिसला आणि आम्ही नकळत प्रेमात पडलो अस होत न ग आपल्या
कल्पनेतील व्यक्ती आपल्या आयुष्यात खरोखरीच येते, आपण हुरळून जातो आणि
नेमकी त्याच वेळेस जाणीव होते की ती आपली कधीही होण शक्य नाही. तरी आपण आता
थांबू मग थांबू करत पूर्णपणे गुंतले जातो. मनात सारखा विचार येतो ग त्याच
लग्न म्हणजे दुसर्या कुणाचा त्याच्या हातात असलेला हात , ते विधी , एकदा
एखादीला स्वतःची पत्नी म्हणून त्याने स्वीकारल्या नंतर मी त्याची एक
मैत्रीण म्हणूनही रहाणार नाही कारण मलाच ते शक्य होणार नाही. आपल माणूस
ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो ते अस दुसर्याच होताना बघण ह्या सारखा
सूड नियती अजून काय घेऊ शकते ? जरी कितीही माहित असल तरी तो क्षण सहन करण
म्हणजे साक्षात मृत्यू बघण …. दूर होण्याची कल्पना सहन होत नाही आणि दूर
होण्यापासून पर्याय नाही " ती खूप रडली. अशा प्रसंगी सांत्वन करू नये हेच
योग्य असत. प्रत्येकाला आपल्या वेदनांच गाठोड स्वतःलाच पेलाव लागत.आपल
प्रेम हरवण दुरावण ह्याची वेदना शेवटपर्यंत मनात रहाते. व्यवहार सांगतो की
आपण सार काही विसरून पुढे गेल पाहिजे पण जर ज्याला विसरायचं तेच माणूस जर
आपल अत्यंत लाडक आणि आवडत असेल तर ते सहज विसरण शक्य होत का ? कुणी कितीही
समजावलं सांगितलं तरी ह्या वेदनेतून जाताना होणारा त्रास कधीच कमी होत
नाही. प्रेम ही गोष्ट आहेच अशी की जिचा त्याग आपण कधीच करू शकत नाही. अजून
एक गोष्ट म्हणजे लग्न लग्न म्हणजे तरी काय ? आयुष्यभरासाठी हवा असलेला
अनुरूप जोडीदार. अनुरूप म्हणजे सौदर्य , पैसा , हुद्दा नाही तर एक
संवेदेनशील माणूस जे आपण जसे आहोत तस आपल्याला स्वीकारून प्रेम देणार ,
समजून घेणार… जागृती आणि प्रथमेश दोघांच्या आवडीनिवडी , तत्व आणि स्वप्नही
एकच होती पण तरीही ते कधीच एकमेकांचे होऊ शकले नाहीत. कारण काहीही असू देत
पण कायमचा विरह त्या दोघांच्या नशिबात आला होता. एक आहे ते दोघे एकत्रित
झाले असते तर एक सुखी आणि आदर्श जोडप नक्कीच बनले असते कारण ते इतके अनुरूप
होते की त्यांना एकमेकांशिवाय पर्याय असूच शकत नाही अस वाटायचं पण शेवटी
नियती आणि परिस्थिती नावाची गोष्ट आपल्या हव असणाऱ्या स्वप्नांवर नेहमीच
पाणी फिरवत आली आहे आणि आपण फक्त स्विकारण एवढंच काय ते करू शकतो नाही का ?
…………. मिनल सबनीस
No comments:
Post a Comment
Comment Here