Pages

28 February 2015

पुर्वदुषित !!!


" मी त्याला चांगलंच ओळखून आहे " असा शेरा आपण एखाद्याविषयी नकारात्मकपणे मारतो तेव्हा तो आपला बालीशपणा असतो अस मला वाटत. कारण जिथे अत्यंत जवळची माणसंही त्यांना ओळखू शकत नाहीत तिथे एखाद दुसर्या अनुभवातून आपण दुसर्याला चांगला किवा वाईट ठरवून मोकळे होतो .खर तर आपल्या स्वतःलाही आपण कसे आहोत हे माहित नसत. कुठल्या प्रसंगी आपली प्रतिक्रिया काय येईल ह्याची खात्री आपणही देऊ शकत नाही मग अस दुसर्याला "ओळखण" हा भाग तर सोडूनच द्यायला हवा. खूप वेळा आपल्या वाईट मताच कारण हे ती व्यक्ती वाईट नसून त्या व्यक्तीने आपल्याला "भाव " न देण हे असत पण हे स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा आपल्यामधे नसतो. एकदा दृष्टीकोन बदलला की त्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टीपण आपल्याला खटकू लागतात. त्याच्या चांगुलपणा सहेतुक आहे अस वाटत. खर तर आपण कधी आत्मपरीक्षण करतच नाही . खूप वेळा वरवर विचार करून आपण एखाद्या व्यक्तीविषयी , त्याच्या वागणुकीविषयी स्वतःच अस ठाम मत बनवतो, असा "पूर्वदुषित ग्रह " मग तो चांगला असो की वाईट आपल्यासाठी परिमाणाच काम करतो आणि त्याच आधारे आपण त्याला जज करत जातो. कुणाच्या मनातील गोष्टी कशा कळणार ? स्वतःच्या अहंकाराला ठेच ही गोष्ट सहसा सहन होत नाही. जी लोक आपला हा कमकुवतपणा ओळखतात ती बरोबर गोड बोलून स्वतःचा कार्यभाग साधून मोकळे होतात. स्पष्ट बोलणारी व्यक्ती आपल्याला आवडत नाही कारण आपले दोष कुणी दाखवण ही गोष्टच मनाला पटत नाही. खर सांगू कितीही मोठे झालो तरी जर आपल्यामधे ही प्रगल्भता आली नाही की आपण परिपूर्ण नसून अनेक दोष आपल्यातही आहेत आणि त्याचा आपण सकारात्मक स्वीकार करायला हवा तर मग त्या मोठ होण्याला काहीच अर्थ नसतो अशा वेळी वाटत लहान मुल आपली गुरु असतात. अहंकार नावाच्या दुर्गुणापासून लांब म्हणूनच त्यांची भांडण ही कधीच टिकत नाहीत. जोडलं रहाण्यासाठी ह्या "मी "पणाची आहुती कधीतरी द्यावीच लागते आणि जिथे ती दिली जात नाही तिथे नाती तुटतात इतकच नाही तर जो आपल्या अहंकाराला गोंजारत नाही तो एखाद्या काट्यासारखा मनात रुतत रहातो कायमचा ……………. मिनल सबनीस
 




No comments:

Post a Comment

Comment Here