"
एखादी घटना , सत्य जेव्हा मनाला पूर्णतः हेलावून टाकत… असा क्षण
ज्याच्यामधे आयुष्याला उध्वस्त करण्याची पुरेपूर क्षमता असते अशा वेळी एकट
असण म्हणजे व्यक्ती चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त असते. कुठल्याही
निर्णायक क्षणी कधीच एकट राहू नये. जेव्हा एखादा मानसिक धक्का बसतो
त्यावेळेस भावनेच्या भरात आपण हमखास चुकीच वागून मोकळे होतो. अशा वेळी सोबत
कुणी नसेल तर बोलावून घ्याव , त्याच्याशी बोलाव जर रडायचं
असेल तर रडून घ्याव अगदी किंचाळून ओरडून मनातील दुखः बाहेर पडण्यासाठी
जागा करून द्यावी कारण ते गरजेच असत. आत्महत्या करणाऱ्या लोकांना अशी
व्यक्ती योग्य वेळी मिळत नाही जी त्या एका "निर्णायक" क्षणी त्यांना समजून
घेईल, समजावून सांगेल. इतर वेळीही एका सुहृदय मित्राची उणीव आयुष्य नको
त्या दिशेला घेऊन जात. अगदीच जवळ कुणीही नसेल तर अशा प्रसंगी सरळ बाहेर
पडाव , लोकांमधे मिसळाव , कुणालातरी भेटाव ज्याने आपल्याला सकारात्मक उर्जा
मिळेल. " तो क्षण " टाळण गरजेच असत …अशी व्यक्ती वेळेत भेटली तर अनेकदा
नात्यांमधे भावनेच्या भरात ज्या चुका घडतात त्या घडत नाहीत. एकूणच जेव्हा
आयुष्य अशा वळणावर येत जेव्हा प्रचंड निराशा , एकटेपणा जाणवतो तेव्हा कधीच
एकट राहू नये कारण हे एकटेपण जो अपरिहार्य भावनिक उद्रेक घेऊन येतो त्यात
आपण अशी चूक करतो ज्याचा पश्चाताप आयुष्यभर करावा लागतो कधी आपल्याला तर
कधी दुसर्याला म्हणूनच काळजी घ्यावी हे उत्तम.
…………मिनल सबनीस
…………मिनल सबनीस
No comments:
Post a Comment
Comment Here