"
Distant Relationship Never Works" अस माझ्या एका मित्राने मला ठामपणे
सांगितलं तेव्हा त्याच्या कारणांविषयी थोडा विचार करावा अस वाटल.त्यातून
मला जी कारण लक्षात आली ती तुमच्याशी शेअर करावी म्हणून हा लेख प्रपंच ....
कितीही मनापासून केल तरी सहवासाशिवाय प्रेम अधूर असत कारण ते खर्या अर्थाने फुलत नाही. नाती , प्रेम सहवास मिळाला की छान बहरून येतात . पण हे अशाच ठिकाणी होऊ शकत जिथे एकमेकांची गरज असते, तुम्ही एकाच भावनिक पातळीवर असता. नात्यात तुमच हव असण म्हणजे प्रेमाची सफलता. कितीही म्हटलं तरी दोन व्यक्तींमधे असलेल स्थानांच अंतर हे कधीही नात्याची इतिश्री करू शकत. वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे जरी प्रेमात पडले तरी त्यांना बांधून ठेवण्यासाठी दोघांमधे असलेल फक्त प्रेम उपयोगी पडत नाही. फोन वरून कितीही संवाद झाले तरी एखाद्या भावूक प्रसंगी, संकटात आपल्या व्यक्तीचे फक्त शब्द त्याच्या नसण्याची कसर भरून काढू शकत नाहीत तेव्हा त्याच जवळ असण जास्त हव असत. आपल्या व्यक्तीने आपल्या सोबतच असाव मग भलेही तिथे रुसवे, फुगवे, थोडेसे वाद असले तरीही…. कारण हे जवळ असणंच तुमच्यातील दुरावा दूर करण्याच एक माध्यम ठरु शकत. दूर असणाऱ्या व्यक्तीसोबत तुमचा वाद झाला की फोन बंद करून मनाची दार पण बंद केली जातात तेव्हा तुम्ही अगतिक होता. तुमच्यावर ती व्यक्ती भावनिक दृष्ट्या फारशी अवलंबून असेलच असही नाही कारण तीच तिथे स्वतःच अस स्वतंत्र विश्व असत आणि तुम्ही अनेकदा एखाद्या आगंतुकासारखे तिच्या विश्वात प्रवेश करता. थोड्याशा बेबनावाने " मला तुझी गरज नाही " हे शब्द समोरून कधीही फेस करावे लागतात. दोघांमधे नसलेलं अंतर हे जस विश्वासाला बळकटी देत तेच असलेल अंतर विश्वासघाताच कारणही ठरू शकत... मनात असलेले अनेक प्रश्न ज्याची उत्तर फक्त नजरेतूनच, चेहर्यावरच्या भावांवरूनच मिळू शकतात ती फोनवरून सहज लपवली जाऊ शकतात. मनातील खऱ्या भावना ह्या शब्दांमधे उतरतीलच अस नसत. दूर असलेली व्यक्ती तुमच्यावर फारशी अवलंबून रहात नाही. ती तुमचा हात कधीही सोडू शकते ह्याची सतत एक धास्ती , भीती मनात घर करून रहाते. ती रहाते त्या ठिकाणी , परदेशी किवा दुसर्या शहरात असणारी अनेक प्रलोभन आपण जवळ नसण्याने कधी प्रेमाच्या नात्यांचा घात करतील ह्याचा अंदाज येत नाही. अशी दुरावलेली माणस नक्कीच ह्याला दुजोरा देतील की प्रेम आणि नात टिकवण्यासाठी तुमच्या व्यक्तीच सोबत असण ही गरज असते. माझ्या मित्राने तो अनुभव घेतला होता म्हणूनही असेल कदाचित तो इतक्या ठामपणे बोलू शकला.

………. मिनल सबनीस
No comments:
Post a Comment
Comment Here