आपण
सोबत असूनही जर आपल्या व्यक्तीला ती एकटी आहे अस वाटत असेल तर तो आपला
पराभव असतो. आपण जगाला जपण्याच्या नादात आपल्याच व्यक्तीवर अन्याय करत
जातो. एखादी वस्तू खूप जवळ धरल्यावर जशी स्पष्ट दिसत नाही त्याच नियमाने
अनेकदा आपल्याच जवळच्या माणसांच्या मनातील एकटेपण आपल्याला कळत नाही. संवाद
, सहवास आणि प्रेम ह्याने ही दरी नक्कीच भरून काढता येते पण त्याची गरज
आपल्याला वाटत नाही आणि शेवटी ही अशी आपल्यावर प्रेम करणारी लोक दुरावली की
आपण काय गमावून बसलो आहे हे लक्षात येत.
………… मिनल सबनीस
………… मिनल सबनीस

No comments:
Post a Comment
Comment Here