
काही
दिवसापूर्वी माझी दुबईला रहाणारी एक जवळची मैत्रीण मुंबई मधे आली होती.
वयाने माझ्यापेक्षा मोठी आहे परंतु मैत्रीमधे वय फारस विचारात घेऊ नये. तिच
आधीच लग्न साधारणतः १७ वर्षापूर्वी संपुष्टात आल. दिसायला अतिशय सुंदर
अनेकांनी सांगूनही एकदा हा अनुभव आल्यावर तिने लग्न न करण्याचा निर्णय
घेतला तो आजपर्यंत ती तिथेच थांबली नाही तर तिने अनाथ आश्रमातील एका अतिशय
गोड मुलीला दत्तक घेतलं आणि तिच्या संगोपनाची पूर्ण
जबाबदारी ती आनंदाने पार पाडत आहे. तिला मी सहज पुनर्विवाहाविषयी विचारलं
तर तिने अतिशय छान उत्तर दिल " मिनू माणस लग्न का करतात ? एक उत्तम जोडीदार
मिळावा म्हणून. माणसांच्या सगळ्या धडपडीमागे एकच लक्ष असत ते म्हणजे सुखी
रहाण आणि मी सुखी आहे. मला आता पुन्हा त्या सगळ्या जंजाळात ( तिने हाच शब्द
वापरला smile emoticon
) नाही पडायचं. जरुरी नाही की पुन्हा लग्न केलंच पाहिजे. लग्न करूनही
एकटे रहाणारे आहेतच ना ? माझी प्राथमिकता आता खूप बदलली आहे. आपल्या भारतात
मुलींसाठी लग्न म्हणजे शेवटची पायरी. त्या एका दिवसासाठी आई वडील
आयुष्यभराची कमाई खर्च करून मोकळे होतात आणि पुन्हा आजच्या काळात आपली
मुलगी सुखी राहील ह्याची शाश्वती कुठलेच पालक देऊ शकत नाहीत. मुलीच नाही पण
मुलांच्या बाबतीत पण हे तितकच खर आहे. आपण व्यवहारी जगात रहातो… इथे
सहजीवन वैगरे गोष्टींपेक्षा व्यवहार अधिक बघितला जातो आणि मला तेच कधी पटल
नाही. ज्या नात्याचा पाया हा भावनिक, वैचारिक असतो त्याला आपण सौदर्य ,
नोकरी , पैसा जमीन जुमला ह्यांच्या तराजूमध्ये तोलून मोकळे होतो. जेवण बनवण
, धुणी भांडी करण म्हणजे संसार नाही ग. आपला जोडीदार हा आपल्याशी
प्रामाणिक आणि समरस होणारा असला पाहिजे. मुली सासरी जातात त्याच मुळी सासूच
टेन्शन घेवून त्यात जर नवरा चांगला नाही मिळाला तर त्या मुलीचे काय हाल
होतात ते मी अनुभवलं आहे.त्यामुळे ज्या नात्याचा अर्थच निरर्थक झाला आहे
पुन्हा त्याच्यात गुंतणे नको…एकटा जीव सदाशिव " अस म्हणून ती दिलखुलास
हसली. खर आहे न आपल सुख शोधण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. आपल्याला ज्यात
सुख मिळत जरुरी नाही की दुसराही तिथे सुखी राहील. आपल्या सुखाची परिमाण आपण
दुसर्याला लावू शकत नाही .लाखोने खर्च केला तरी जर दोघांच भावनिक विश्व जर
जुळलच नाही तर त्या लग्नाला काहीच अर्थ उरत नाही. ती दुबई मधे रहाते ते
तिच्यासाठी खूप चांगल आहे कारण तिथे कुणी कुणाला ह्या गोष्टीवरून नाव ठेवत
नाही पण भारतात मात्र लोकांची मानसिकता ज्यांना लग्न करायचं नाही किवा
ज्यांचा घटस्फोट झाला आहे अशांविषयी दुषितच असते. आयुष्यातील खूप मोठ सुख
गमावलं आहे अशा पद्धतीने त्याला वागवल जात , नाव ठेवली जातात .लग्न म्हणजे
सर्वस्व नाही ह्याची जाणीव समाजाला ,पालकांना आणि मुला मुलीना कधी होणार ?
ज्यांना ह्या बंधनात अडकायचं आहे, पुन्हा नव्याने सुरवात करायची आहे
त्यांनी नक्कीच प्रयत्न करावा परंतु ज्यांना इच्छा नाही त्यांच्या
इच्छेचाही मान ठेवण हे सुद्धा आवश्यक आहे नाही का ?
.................. मिनल सबनीस
No comments:
Post a Comment
Comment Here