तस
बघायला गेल तर ह्या जगात कधीच कुणाच कुणावाचून अडत नाही. नुकतच जन्माला
आलेल बाळही आईशिवाय जगत तर आपण तर मोठी माणस. सगळी समीकरण गरजेची असतात जी
काही काळाने सरली की माणसंही दुरावली जातात . ह्याच प्रोसेस मध्ये आपल्याला
एखाद एकतर्फी "प्रेमभंगासारखं" जीवघेण दुखः कुणीतरी देत आणि आपण पूर्णतः
स्वतःला सगळ्या आनंदापासून वंचित करून मोकळे होतो आणि मुख्य म्हणजे ज्या
व्यक्तीने दुखः दिल ती मात्र आपल्या वाटेने पुढे
जाते आणि सुखी रहाते कारण ती आपल्यात गुंतलेलीच नसते. अस अनेकदा घडत
तुम्ही ज्यांच्या प्रेमात पडता त्यांच्या भावना जाणून न घेता त्यांची
प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्यांचही तुमच्यावर प्रेम आहे हे दर्शवणारी वाटते.
कालांतराने अस काहीच नव्हत हे जेव्हा कळत तेव्हा तुमची चूक तुमच्या लक्षात
येते. आपल्या स्वप्नांना ठेच लागते तेव्हा माणस ओळखायला शिकलं पाहिजे
ह्याची जाणीव होते. एकतर्फी प्रेमाची शोकांतिका ही अशी ठरलेली असते
.कुणाच्या प्रेमात पडण हा गुन्हा कधीच असू शकत नाही उलट तुम्ही चांगले असता
म्हणून तुम्हाला कुणीतरी मनापासून भावत त्यामुळे आपल्याला दोष देण टाळल
पाहिजे. आयुष्य आणि वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही. पुन्हा जेव्हा आयुष्यात
हा प्रेमाचा वसंत बहरतो, जेव्हा एखादी "आपल्यावर" खर प्रेम करणारी व्यक्ती
भेटते तेव्हा प्रेम आणि नाती ह्या शब्दांचे खरे अर्थ आपल्याला कळतात. ज्या
प्रेमाने आयुष्यातला आनंद हिरावून घेतलेला असतो तेच प्रेम पुन्हा जगण्याच
कारण बनत प्रेम हे जोर जबरदस्तीने करता किवा मिळवता येत नाही. प्रेमभंगाच
दुखः रहातच परंतु ते दुखः म्हणजे आयुष्य समजण्याची गरज नसते .तुमच्यावर
प्रेम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही स्वीकारून तीच आयुष्य तुम्ही सुखाने आणि
समाधानाने भरू शकलात तर कुठेतरी ती जखम नक्कीच भरून निघते. जे निघून गेल ते
परतून कधीच येत नाही आणि जरी आल तरी त्याच स्वरूप हे बदललेलं असत. कदाचित
कालांतराने असही घडेल की आपण ज्याला प्रेम समजत होतो ती फक्त आपली आवड होती
हे लक्षात येईल. एकूणच काय जोवर आयुष्य आहे तोपर्यंत हे अस पडण , धडपडण
चालूच रहाणार. भावनांच्या विश्वात हे हसू आणि आसू ह्याच नात नेहमीच सोबत
असणार. निराश न होता जे आल ते स्वीकारून पुन्हा नव्याने सुरवात करण म्हणजे
जीवनाची खरी ओळख तुम्हाला पटली आहे अस म्हणता येईल………… मिनल सबनीस
No comments:
Post a Comment
Comment Here