प्रेम
म्हटलं की रुसवे आले, वाद आले अगदी भांडणही आली. खर सांगायचं तर जेव्हा
आपला आपल्या व्यक्तीशी वाद होतो तेव्हा पूर्ण दिवस हा अगदी खराब जातो हा
नेहमीचा अनुभव आहे. उदाहरण द्यायचं तर ट्रेन ची गर्दी रोजचीच असते पण त्या
विशिष्ट दिवशी आपली प्रचंड चिडचिड होते. छोटी छोटी कारणही मनस्ताप देणारी
होतात.आपल्यालाही कळत चिडण्यासारख काहीही नव्हत. त्याच गोष्टी पण दृष्टीकोन
बदललेला असतो. कुठेतरी आपली नाराजीच आपण ह्या
सगळ्या गोष्टींवर काढत असतो. भांडण होताना चूक कुणाचीही असली तरी माघार
घेण हे नेहमीच कमीपणाच मानल जात कधी कधी अहंकाराला आत्मसन्मानाच नाव देवून
आपण मोकळे होतो. गंमत अशी की दोघांचही लक्ष मोबाईल वरती असत की दुसरा फोन
करेल आणि सोरी म्हणेल.… पण जसा जसा वेळ जातो तशी तशी ही अस्वस्थता वाढत
जाते .आपण उगाच चिडलो , त्याला किवा तिला दुखावेल अस बोललो अस वाटू लागत.
मग एक आपल्यातील मीपणाशी आपल्या प्रेमाचा संघर्ष चालू होतो . आपल्या
व्यक्तीच्या अनेक चांगल्या गोष्टी आठवायला लागतात. सोबत घालवलेले क्षण मनात
रुंजी घालू लागतात मग कुठेतरी रागाच कारण किती मामुली होत हेही जाणवत.
दोघांमधे जो जास्त समजूतदार असतो आणि ज्याला अहंकारापेक्षा नात जास्त
महत्वाच वाटत तो पहिला फोन करून सोरी म्हणून मोकळा होतो. मग दुसराही
स्वतःची चूक स्वीकारतो आणि दोघांच्याही मनावरच ओझ हलक होत .हेच तर प्रेम
असत. खर तर चूक कोणाचीही असू दे संवाद कधी तोडू नये जेव्हा तुम्ही अस
म्हणता की आमच एकमेकांवर खूप प्रेम आहे तेव्हा तर संवादाला कधीच तिलांजली
देऊ नये. खूप राग आला की आपल्या व्यक्तीच प्रेम , त्याने सांभाळून घेतलेले
अनेक क्षण दोघांनी आवर्जून आठवावेत म्हणजे वादाची तीव्रता खूप कमी होत
जाते. वाईट वेळ आल्यावर चांगल्या काळाच्या आठवणी नात्याला तुटू देत नाहीत.
शेवटी प्रेम प्रेम म्हणजे तरी काय ? हे असच आपल्या प्रेमाला आणि व्यक्तीला
अहंकारापेक्षा जास्त महत्वाच मानण. नात तोडण्यापेक्षा थोडीशी माघार घेण पण
त्याला जपण. जिथे तो आहे तिथेच आपला आनंद असतो मग कशाला हवा हा अट्टाहास
?त्यात त्या त्याला सुख न तुम्हाला… शेवटी जिथे तू तिथे मी अस साध गणित
प्रेमात सांभाळल की नातही छान जपल जात आणि आपणही नेहमी आनंद रहातो.
……मिनल
सबनीस
No comments:
Post a Comment
Comment Here