"विश्वास" किती मोठा शब्द आहे. जीवनाचा अथांग सागर या एका शब्दात सामावलेला आहे.
या विश्वासाच्या लाटेवरच नात्यांची नावं तरली जाते.
कुठल्याही व्यक्तीचा विश्वास मिळवणं तसं सोपं आहे. पण तो टिकवून ठेवणं मात्र जास्त कठीण आहे.
कारण विश्वास हा काचे प्रमाणे आहे. एकदा का त्याला तडा गेला तर तो पुन्हा सांधता येत नाही.
आपण जेव्हा एखाद्याचा विश्वास मोडतो तेव्हा त्या व्यक्तीच्या भावनांचा खेळ मांडतो त्यांची प्रतारणा करतो.
आपल्याला तेव्हा त्या नात्याची ओळखच पटलेली नसते.
तुमच्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती तुम्हाला जवळच मानते. तुमच्या कडून तिला काही अपेक्षा असतात.हे प्रत्येकानेच समजून घेतले पाहिजे.
जेव्हा तुम्ही एखाद्याची फसवणूक करता. तेव्हा तुम्ही नकळत स्वतःच्या मनाला देखिल फसवत असता.
"आरशात दिसणारे प्रतिबिंब जरी खोटे, आभासी असले तरी ते दाखवणारा आरसा मात्र खरा असतो."
म्हणून ते प्रतिबिंब होण्यापेक्षा तो आरसा बनण्याचा प्रयत्न करा.
"विश्वासाचे बीज मानवी नात्यात रूजवण्यासाठी स्वः मनाशी प्रामाणिक रहा. विश्वास सांभाळा, नाते जपा."
No comments:
Post a Comment
Comment Here