Pages

12 March 2015

"सुसंवाद"

"सुसंवाद" हा अतिशय गरजेचा असतो. कुठल्याही दोन व्यक्तींमध्ये सुसंवाद असणे आवश्यक. नाहीतर गैरसमज निर्माण होतात. आणि नात्यांमधले ताणतणाव वाढत जातात.
काही वेळा तर ठरवून देखिल वेळे अभावी फक्त संवादच होतो. किंबहुना तो ही जमत नाही. मग विचारांची देवाणघेवाण मनाजोगी होत नाही. अन् नवे वाद सुरू होतात.
मानवी स्वभावाचे अनेक गुणधर्म आहेत. आणि त्यातूनच आशा आकांक्षाचा उगम होतो. त्यामुळेच आपल्या माणसांच्या शाब्दिक आधाराची गरज वाटू लागते.
"एक चांगला संवाद हा नेहमीच दोन व्यक्तींच्या मनातील भावनांना जोडतो."
एकाच कुटुंबात रहाणार्‍या सदस्यांचा जेव्हा "सुसंवादाचा" धागा सैल होतो. पर्यायाने सहवास कमी होतो. तेव्हा त्या घरातील आनंद लहरींचा प्रवाह कुठेतरी थांबल्या सारखा वाटतो. म्हणायला निमित्तमात्र म्हणून एकत्र रहाणे होते.
तेव्हा आपल्या जीवलगांना खुप वेळ देणे जरी जमले नाही. तरीही जेवढा वेळ द्याल त्या वेळेस सुंदर सहवास आणि त्याला पूरेशी "सुसंवादा "ची जोड असू द्या.त्यामुळे नात्यातले सौंदर्य द्विगुणित होईल हे निश्चित.

No comments:

Post a Comment

Comment Here