जीवनातील एकाकीपणा हा कायमचाच सोबती असतो. आपण जेव्हा आपल्या माणसांच्या,
गोतावळ्यात असतो, तेव्हा सुद्धा हा एकाकीपणा एका
विशिष्ट पद्धतीने आपल्याला सलत असतोच. आयुष्यात काही क्षण आनंदाचे मोती आपल्याला देऊन जातात. परंतु क्षणिकच.
जीवनातील एकाकीपणा दूर करावासा वाटला की, माणसाच्या भावभावनांना संघर्षांची पालवी फुटते.
अन् तो त्या विरस वातावरणातून बाहेर पडण्यासाठी केविलवाणी धडपड करू लागतो. यात जर अपयश आले तर कपाळमोक्ष झाल्यासारखे वाटते. आणि यशस्वी झाल्यावर हर्षाची नवी किरणं सर्व जीवन तेजोमय करून जातात.
या जगात जे आपलं आहे म्हणून आपण भांडत असतो. काही वेळा तेच नेमकं अपेक्षाभंगाचे दुःख देऊन जाते. आपण आपल्या माणसांकडून अनेक अपेक्षा ठेऊन असतो.आणि त्या पूर्ण होण्याची आस मनी उत्पन्न करतो. परंतु, या जगात आपल्या भोवताली असलेला गोतावळा संकटकाळी कधी एकाकी पाडून निघून जाईल याची खात्री देता येत नाही. तेव्हा स्वतः खंबीर असणे जास्त महत्वाचे असते.
एखाद्या अवचित समयी आपला एकाकीपणा कायम आपल्याशी बोलका होतो. आणि आपले हितगुज पुसू लागतो.
म्हणून तर ह्रदयाच्या सुवर्ण पेटीत आनंदमोतींचा आठवणरूपी संग्रह करणे मात्र आपल्याच हातात असते नाही का!

No comments:
Post a Comment
Comment Here