Pages

12 March 2015

अश्रू - सर्वात मोठं दालन

कधी कधी मनात असं काही दाटून येतं......
मनातलं दुःखं मांडताना आभाळ सुद्धा तोकडं पडतं.....

जीवनाच्या प्रवासात अनेक वळणं येतात. काही वळणं देखणी असतात तर काही तितकीच कठोर , रूक्ष.
काही वेळणे आपल्या जीवन प्रवाहाला नवं दिशा ,नवी कलाटणी देणारी असतात.
पण महत्वाची नुसती ही वळणे नसून, त्या प्रत्येक वळणावर गाठणारे , मन मोहून टाकणारे, आनंद देणारे काही क्षणही तितकेच महत्वाचे असतात.

आता कुठल्या क्षणाने काय दिलं, काय घेतलं .कुठल्या क्षणात काय कमवलं अथवा गमवलं याची बेरीज-वजाबाकी म्हणजे जीवन.आणि याचा भागाकार -गुणाकार म्हणजे भाग्य.
हा हिशेब जितका भावनिक तितकाच व्यवहारीक.

म्हणून तर अश्रू हे केवळ मनात दाटलेल्या भावना उचंबळून आल्यानंतर ,त्या भावना मुक्त करणारी फक्त एक वाट नसून , ते आयुष्यातील सर्वात मोठं दालन आहे.

No comments:

Post a Comment

Comment Here