Pages

12 March 2015

भावना

मनातल्या भावना समजण्याची सुद्धा एक कला अवगत असावी लागते. आपल्या समोरच्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेण्यासाठी त्याच्या भावविश्वात होणाऱ्या सूक्ष्म बदलांचेही आकलन होणे गरजेचे आहे.

कित्येकदा आपण जे बोलतो ते आपल्या व्यक्तीच्या कानापर्यंत पोहचते पण मनापर्यंत पोहचत नाही.
कारणे अनेक असतात. पण ती आपल्याला पटत नाहीत. कदाचीत आपण एकतर्फी विचार करत असतो.
ते काही असो , पण त्रास हा होतोच. त्यातूनच मग नवे वाद निर्माण होतात. कुठेतरी सामंजस्य कमी पडते एवढे मात्र निश्चित.

संताप ही मनातीलच एक उग्र भावना आणि प्रेम ही मनातील हळूवार गोड भावना.
दोन्ही एकाच गाभाऱ्यातील परंतु, परस्पर विरोधी.
संताप जेवढा घातक, आयुष्य उध्वस्त करणारा, आपल्या माणसांना दुखावणारा ,तितकेच प्रेम सुखावह, आयुष्य फुलवणारे, आपल्या माणसांची मनं जोडणारे.

जर माणसासमोर विष आणि अमृताचा प्याला या गोष्टी असतील तर जाणीवपूर्वक माणूस अमृताचीच निवड करेल. मग राग आणि प्रेम यामध्ये बर्याचदा निवड करताना आपण जाणून बुजून रागाची निवड का करतो? हे समजण्या पलिकडे आहे. 

No comments:

Post a Comment

Comment Here