अनेकदा
अस घडत की एखाद नात तुमच्यासाठी जितक महत्वाच असत नेमक समोरच्या
व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्याची किंमत ही खूप कमी असते. एखाद्याच्या
छोट्या छोट्या गोष्टी जपण्यामध्ये तुम्हाला जो आनंद मिळतो तो नेमका
त्याच्यासाठी बिन महत्वाचा असतो. कितीही म्हटलं की प्रेमामधे आणि नात्यामधे
काही अपेक्षा ठेवायची नाही तरी ह्या जगात देव कुणीही नसतो त्यामुळे
साहजिकच आपल्या अपेक्षा ह्या असतातच. जेव्हा आपल्याच व्यक्तीच मन
नात्यामधून उडत तेव्हा ह्याच छोट्या छोट्या गोष्टी त्याला चीड आणणाऱ्या
ठरतात. नात पुढे जात त्यात एकाची असलेली भावनिक गुंतवणूक वाढते तर
दुसर्याची कमी होते तेव्हा जो खर्या अर्थाने गुंततो तोच आयुष्यातून उठतो.
प्रेम व्यवहार जाणत नाही आणि म्हणूनच की काय खर्या प्रेमाची किंमत ह्या
जगात कुणीही ठरवू शकत नाही. काही लोक ह्याच व्यवहाराच्या नादी लागून आपल्या
आयुष्यातील अत्यंत महत्वाच नात कायमच गमावून बसतात आणि दुसरा मुळात
प्रेमाला पर्याय शोधायचा कसा ? ह्या प्रश्नांच्या उत्तरात स्वतःला हरवून
बसतो. एखाद्या नात्याचा अंत होताना तो कधीच एकतर्फी होत नाही. आपल्याच
व्यक्तीचा आपल्या भावनेला न मिळालेला प्रतिसाद प्रेमाला कोमेजून टाकतो आणि
मग हळू हळू दुसरी व्यक्ती पण उदासीन होत जाते. हा अन्याय ज्या व्यक्तीवर
होतो तिचा प्रेम ह्या संकल्पनेवरचा विश्वास मात्र कायमचा उडतो आणि तो
पूर्णतः एकाकी होतो. नात्याची भावनिक जबाबदारी ही खूप मोठी असते आणि
जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यावर भावनिक दृष्टीकोनातून अवलंबून असते तेव्हा
तिला एकट न सोडण हे गरजेच असत. कुणाच मन आणि भावना दुखावून कुणी सुखी रहात
नाही आणि जिथे एखाद्या निरागस मनाला दुखावून आपण सोडून देतो तेव्हा तर
आयुष्याच्या एका वळणावर त्याची किंमत ही तुम्हाला चुकवावी लागते. जे प्रेम
देतात त्यांचा आदर , त्यांची काळजी घेऊन त्यांना त्याच्या हक्काच प्रेम
जेव्हा देता तेव्हा तुम्ही स्वतःही आनंदी आणि संपन्न होता हे नेहमीच लक्षात
असू द्या .
………… मिनल सबनीस
No comments:
Post a Comment
Comment Here