Pages

03 March 2015

जिंदगी बन गये हो तुम ....

अस म्हणतात व्यक्ती ही सवयीची गुलाम असते आणि सवय कधी व्यसन बनत ते कळत नाही. सवयी तशा सगळ्याच वाईट नसतात पण अतिरेक झाला की मात्र चांगल्या सवयी सुद्धा हानीच करतात. ह्या सवयींमध्ये एक सवय जी खरच खूप वाईट असते ती म्हणजे एखाद्या व्यक्तीच आपल्याला सतत हव असण. एकमेकांची ओढ ही प्रेमाची पर्यायाने नात्यांची पहिली गरज असते. सतत कुणीतरी आपल्याला सांभाळणार हव असत. आपल माणूस आपल्या जवळ असण ह्या सारख सुख जगात कुठेही नसत पण हीच आपल्या व्यक्तीची सवय आपल्याला जेव्हा परिस्थिती बदलते व्यक्ती बदलते तेव्हाएका वळणावर पूर्ण एकट करते. अनेकदा अस होत की आपण किती गुंतलो आहोत हे ती व्यक्ती सोबत असते तोवर लक्षात येत नाही परंतु जेव्हा कधी तीच "असण" आता असणार नाही हे लक्षात येत तेव्हा झालेला भावनांचा गुंता सुटता सुटत नाही. तिच्या असण्याची सवय तिच्या नसण्यात परिवर्तित करताना ज्या मरण यातना भोगाव्या लागतात त्या तीच व्यक्ती जाणो. मुख्य म्हणजे हे अस गुंतणं आपल्या हातात कधीच असत नाही. ही एक अशी ओढ असते ज्याची कारण शोधण कधीच शक्य होत नाही. ठराविक व्यक्तीच आपल्याला का हवी असते. तिच्यासाठीच काहीही झाल तरी खूप काही का करावस वाटत , तिलाच का जपावस वाटत ?ह्याच उत्तर आजवर कुणीच देऊ शकल नाही आहे. व्यक्तीची सवय होते म्हणजेच आपल आपल्या मनाच तिच्यात गुंतण असत. अशी व्यक्ती जेव्हा आपला निरोप घेते तेव्हा वाटत खरच ही सवय वेळेतच मोडायला हवी होती. तीच बोलण, हसण तिचा सहवास ह्या सगळ्या हव्याहव्याश्या गोष्टींचा मोह वेळेतच आवरायला हवा होता. जर अस केल असत तर आज तिच्याशिवाय मन आणि आयुष्य अस एकट एकाकी झाल नसत. जी व्यक्ती जाते ती मुक्त होते पण आपण मात्र त्या पिंजर्याला सोडायला तयार नसतो जणू काही तेच आपल आयुष्य आहे … अस्तित्व आहे म्हणतात न प्रेमाचा प्रवास हा नदीच्या प्रवाहासारखा असतो पुढे तर जाऊ शकतो पण मागे वळून येण निव्वळ अशक्य. जिथे अंत होतो तिथेच तो थांबतो नाही का ?
…………… मिनल सबनीस



No comments:

Post a Comment

Comment Here