Pages

03 March 2015

पासवर्ड भावनांचा !!!


आजच्या काळात " पासवर्ड " हा शब्द माहित नाही अशी व्यक्ती सापडण खूप विरळा आहे. ह्या एकाच शब्दात एक सकारात्मक तर दुसरी नकारात्मक भावना निर्माण करण्याच सामर्थ्य आहे. एकीकडे सुरक्षेची भावना आहे तर दुसरीकडे अविश्वास. मशिन्स साठी पासवर्ड जसा सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वाचा असतो तोच नियम अनेकदा आपल्या भावनांसाठी गरजेचा होतो. भावनांचा पासवर्ड म्हणजे आपल सुख आणि दुख कुठल्या गोष्टीवर अवलंबून आहे ह्याचा स्वतःशिवाय कुणाला पत्ता लागू न देण. काय होत न एकदा ह्या गोष्टींची वाच्चता झाली की आपल्या भावनांची सगळी सूत्र ही दुसर्याच्या हाती जातात. सगळेच तसे नसले तरी सगळ्याच भावना बोलून दाखवण, व्यक्त करण म्हणजे आपल्या आयुष्याच्या पुस्तकाच जाहीर प्रदर्शन मांडल्यासारख होत. आपल्या सुखदुखाची किल्ली दुसर्याच्या हातात गेली की समोरचा स्वतःला हव तस आपल्याला वागवायला सुरवात करतो. ह्यासाठी भावनांचा पासवर्ड हा खूप गरजेचा असतो. जस आपण आपल्या अत्यंत विश्वासाच्या व्यक्तीलाच तो देतो त्याच नियमाने इथेही वागाव. जो पर्यंत एखाद्याची विश्वासार्थता पटत नाही तोवर काही गोष्टी , भावना अव्यक्त राहिलेल्या केव्हाही चांगल्या असतात.खर तर मनाचा एक कोपरा हा नेहमीच असा ठेवावा जो कधीच कुठे व्यक्त करू नये. सगळ्याच आठवणी चांगल्या नसतात पण वाईट आठवणीही शेअर करताना दुसरा काय विचार करेल ? तो आपल्या भावना समजून घेण्याच्या योग्यतेचा आहे का हे पडताळून पहाण खूप गरजेच आहे. शेवटी पासवर्ड हा धोक्यापासून "सुरक्षा" देतो हेही लक्षात ठेवलं पाहिजे. एकदा आपल्या काही व्यक्तिगत गोष्टी बाहेर पडल्या की पुन्हा त्यावर कुठल्याही प्रकारे आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. उद्या त्याचा बोभाटा झाला तर फक्त आणि फक्त पश्चाताप करण एवढंच बाकी रहात. यंत्राला दिलेला पासवर्ड बदलता येऊ शकतो पण एकदा व्यक्त झालेलं सत्य पुन्हा मागे घेता येत नाही आणि म्हणूनच हा महत्वाचा पासवर्ड सहसा कुणाला देऊ नये कारण एकदा दिल्यावर पुन्हा त्याच्यामधे बदल करण शक्य नसत ह्याची जाणीव नेहमी ठेंवावी.,
,,,,,,,,, मिनल सबनीस

No comments:

Post a Comment

Comment Here