Pages

14 March 2015

प्रेम !!!

प्रेम असत हळुवार फुलासारखं … जेव्हा निर्माण होत तेव्हा ते असत
काहीस लाजाळू ,निरागस ,लोभस …मुग्ध कळीसारख… ज्या प्रमाणे
फुलांच्या पाकळ्यांवर रवि किरणांचा लालिमा चढत जातो तसच
प्रेमही एकमेकांच्या सहवासात छान उमलत जात. जितका सुसंवाद अधिक
तितक एकमेकांना समजून आणि सांभाळून घेण अधिक. फुलासोबत
काटेही असले तरी त्याचा ओरखडा कायमचा कधीच
मनात धरायचा नसतो.चुकांमधून काय टाळायला हव हे जाणून घेतलं
की एकमेकांना दुखावण्याचे प्रसंगही कमी होत
जातात. " आपण प्रेमात पडलो आहोत " ही जाणीव
व्यक्तीला जगाकडे बघण्याचा एक सुंदर दृष्टीकोन देऊन जाते.
अशी आयुष्यभराची सोबत करणार, समाधान देणार
आणि आपल्याला हव असलेल छान माणूस देणार हे प्रेम म्हणजेच
जीवनाची खरी मिळकत असते…मिनल
सबनीस

No comments:

Post a Comment

Comment Here