"अपेक्षा"
हा तिन अक्षरी शब्द खुप काही मागत असतो. आपण आयुष्यात प्रत्येक जण
कुणाकडून किंवा कुणाचीतरी अपेक्षा करतच असतो. पण अपेक्षा जर अवाजवी असेल तर
अपेक्षाभंग हा ठललेलाच असतो.
कुणाकडून काय हवे हा विचार करताना आपण कित्येक वेळा समोरच्या व्यक्तीला गृहीत धरतो. आणि तिथेच सगळा गोंधळ होतो.
आपल्या माणसांकडून अपेक्षा ठेवताना आपण नकळत त्यांचे स्वतंत्र अस्तित्व विसरून जातो.आणि आपल्याला हवी तशी परिस्थिती, तसे अनुकूल वातावरण निर्माण झाले नाही की त्रागा करतो.
अपेक्षा ठेवावी त्यात गैर नाही. पण प्रत्येक अपेक्षा पूर्ण व्हावीच असा अट्टाहास हमखास क्लेशकारकच.
समाधानी वृत्ती हा खरा आनंदी मनाचा मूलमंत्र आहे. असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेता आले की आनंद आपोआपच पाठलाग करत येतो.
तेव्हा अपेक्षा ठेवावी पण ती ठेवताना येणारे परिणाम स्विकारण्याची तयारी मात्र जरूर ठेवावी.

No comments:
Post a Comment
Comment Here