Pages

23 March 2015

का रे दुरावा


दुपारी एका मैत्रिणीचा फोन आला. " मिनल अमोलची पत्रिका बघ ग जरा. आजकाल खूप भांडत असतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालतो. लग्न ठरलं आहे आमच पण आता म्हणतो मला कंटाळा आला आहे. मला थोडा वेळ दे निर्णय घ्यायला. मला खूप टेन्शन आल आहे.मी सुद्धा त्याला खूप काही बोलते, आमचे वाद काही मिटत नाहीत तू प्लीज पत्रिका बघ आणि सांग ". मी तिला हो म्हटलं पण तू का शांत रहात नाहीस अस विचारल्यावर "मी शांतच असते पण एकदा का राग आला की मला भान रहात नाही. मग मी काय मेसेज करते ते मलाच कळत नाही " अस उत्तर तिने दिल. त्यावर मी तेव्हा शांत राहिले पण नंतर मात्र मला खूप हसायला आल. कारण माहित नाही पण तरीही दोन व्यक्तीच्या नात्यात प्रेम असल की तक्रारी असतातच आणि त्याचं तर लग्न ठरलं होत. कधी कधी काय होत न एकदा का आपण असुरक्षित फील करायला लागलो की मनाचा बांध सुटत जातो आणि गोष्टी अजून बिघडायला लागतात. त्यासाठी पत्रिका बघायची गरज होती अस मला वाटल नाही. अमोल एक तसा बुद्धिमान मुलगा आहे. मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे. पण त्याचा एक असा स्वभाव आहे की एकदा का त्याच्या डोक्यात एखादी गोष्ट बसली की ती काही केल्या जात नाही. त्याला माझ्या मैत्रिणीने अशी काही कारण दिली की तो लग्नाच्या निर्णयालाच विरोध करू लागला. ती खूप चांगली आहे आणि तीच अमोल वरती प्रेमही खूप आहे परंतु तिला बोलताना अनेकदा भान राहिल नाही आणि तिच्या काही शब्दांनी तो विलक्षण दुखावला गेला. त्यांच्याच नाही आपल्याही बाबतीत हे घडून गेलेलं असेल, संयमाने नाती बांधलेली रहातात पण एकाने जरी त्याची कास सोडली की नात विखुरल जात. एक चिडतो तेव्हा दुसराही चिडू लागला तर वाद वाढतच जातात त्यापेक्षा अनेकदा माघार घेवून शांत रहाण योग्य असत त्याने बिघडलेल्या अनेक गोष्टी मार्गी लागतात. अहंकार , मी पणा ह्या गोष्टी जिथे प्रेम आहे तिथे चालत नाहीत आणि हेही तितकच खर आहे की दोघांनी एकमेकांच्या भावनांचा आणि नात्याचा आदर ठेवला पाहिजे. खूप वेळा आपली व्यक्ती वेगळ्याच मानसिकतेत असते आणि नेमका तेव्हाच वाद होतो . अशा वेळेला जे बोलायला नको तेच आपण बोलून जातो हेतू दुखावण्याचा नसूनही आपल्या तोंडातून नको ते शब्द बाहेर पडतात आणि मग क्षमा मागूनही काहीच होत नाही. आजकाल व्यक्तिगत नाती फारशी सुधृढ नसतात आणि नकळत हीच निराशा नोकरीच्या ठिकाणी पण आपण अनुभवतो. थोडासा विचार केला तर वेळ काळाच भान ठेवलं आणि आपल्या व्यक्तीचा मूड बघून काही विषयांची अगदी वादाच्याही विषयांचीही चर्चा केली तर त्यातून संघर्ष नाही तर तोडगाच निघतो. मी हे मैत्रिणीला वेगळ्या भाषेत समजावून नक्कीच सांगीन पण काही नाती ही खरच खूप नाजूक असतात आणि ती तशीच हाताळावी लागतात. तिथे चुकीनही झालेली चूक फक्त आणि फक्त शिक्षेसच पात्र होते 
……………… मिनल सबनीस

No comments:

Post a Comment

Comment Here